तो तिच्या वर चढला,
म्हणून तुम्ही का हो त्याला नडला,
शिडी त्याचीच, चढणारही तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

त्याने तिची नाडी ओढली,
तुम्हाला त्याची का हो पडली,
चड्डी त्याचीच, ओढणार ही तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

त्याने तिचे दोन्ही दाबले,
तोंड तुमचे का हो आंबले,
साईकल त्याची, ब्रेकही दाबणार तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

त्याने तिला तेल लावून रगडली,
तुमची तब्बेत का हो बिघडली,
मानही त्याचीच, रगडणार ही तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

त्याने तिला वाकवली, 
तुमची का हो उगाच सटकली,
छड़ी ही त्याचीच, वाकवणारही तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

त्याने तिला पेटवली,
तुमची का हो जळली,
सिगरेट त्याची, फुंकणार तोच,
तुम्हाला का हो लागली त्याची बोच ?

- मंगेश पाडगांवकर