मी, अनिल शर्मा. वय वर्षे ७१ (एक्काहत्तर).अगदी अलीकडॅ मी बेँगळुरू या शहरात रहायला आलो. कर्नाटकात कानडी भाषा बोलली जाते. मला अजूनी तशी कानडी भाषा नीट येत नाही. जवळपास शेजारी पाजारी कानडी भाषेतच बोलतात. अचानक एक तरूण मुलगी दिसली. माझ्याशी जमेल त्या प्रमाणे इँग्रजीत बोलू लागली. तिची आई माझ्याशी जमेल त्या प्रमाणे मराठीत बोलू लागली. " मला दोन मुली. पहील्या मुलीच लग्न झाल आणि ती सासरी आहे. ती अजून माझ्याशी भाण्डते. 'मला का वाचवल नाही?' सासरीसुद्धा तिच हेच म्हणण, ' मला का वाचवल नाही?" मी बुचकळ्यात पडलो. "तुमच्या मुलीच बर वाईट तर काही झाल नाही ना?" छे हो! ती तशी सुखात आहे" मला नन्तर उलगडा झाला. कानडी भाषेत वाचवण म्हणजे शिकवण- वाचायला शिकवण- ओदिसियुदु !
अनिल शर्मा
Post new comment