लाडु

गणिताचा तास सुरु असतो.
गुरुजी: गोट्या, समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.
गोट्या: माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी: अरे समझ की, तुझ्या बापाचं काय जातं?
गोट्या: खरं माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी: बरं, तू बस...अरे बंड्या, समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.
बंड्या: माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी: अरे मुर्खा, समज की, तुझ्या बापाचं काय जातं?
बंड्या: बरं, ठीक आहे, पुढे सांगा.
गुरुजी: तुझ्याकडे १० लाडू आहेत आणि मी तुला ५ लाडू दिले... किती लाडू झाले?
बंड्या: २०!!!
गुरुजी: काय रे गाढवा ५ आणि १० २० होतात?
बंड्या: समजा की हो गुरुजी, तुमच्या बापाचं काय जातं?

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options